Tuesday, April 15, 2008

मी आणि क्ष..

मी एक क्ष ! पण 'क्ष'च का?? य, र, ल किंवा अ,ब,क का नाही?? तसही 'क्ष' ला काय असते किंमत?
तर मला असं वाटतं, कुठ्ल्याही गणितीक साहित्याची सुरुवात 'क्ष' या अक्षरापासुनच होते.
म्हणजे आपण म्हणतो ना, समजा क्ष = अमुक अमुक
किंवा कधी कधी कुठल्या प्रश्नात काही ठिकाणी उत्तर पण 'क्ष' असं ग्रुहीत धरायला लागतं.(काय य् य् य् य्??)
उदा. समजा ५अ + ४ब = किती? तर याच उत्तर काढताना, ५अ + ४ब = क्ष असं ग्रुहीत धरु, असं आपण म्हणतो.
तर अशा ग्रुहितकात 'क्ष' च महत्त्व अजुन तरी अबाधित आहे.
पण म्हणुन मी म्हणजे अमुक अमुक किंवा अमुक अधिक तमुक म्हणजे मी, असही नाही.
मग म्हणजे मी म्हणजे नक्की काय? काय की.. :(
पण उगाच आपल म्हणायच, मी एक क्ष..

अपुर्ण..

Monday, April 14, 2008

मी आणि आयुष्यावर बोलु काही

मध्यंतरी कार्यालयात ब्लोगर बंद झाल होता, म्हणुन काही पोष्ट टाकता आल्या नाहीत.. मागची एक पोष्ट बाकी होती ती टाकतो..
दि. १८ मार्च २००८


मी आणि आयुष्यावर बोलु काही
आयुष्यावर बोलु काही च्या ४०० व्या भागाला (जरा नाखुशीनेच) जाणं झालं. आतापर्यंत हा प्रयोग ५-६ वेळेस तरी बघितला आहे. पर्वाचा बोर नाही झाला. पण अगदिच अंगात पण भिनला नाही. नेहमी जसा भिनतो तसा. जेवण मात्र छान होतं ( अननस शिरा :) ) असो.
काही प्रीयजनांच्या आग्रहाला बळी पडून ४०० रु. घातले. एक मात्र खटकलं, मध्यांतरा नंतर काही लोकांनी ह्या कार्यक्रमाविषयी आपल्या भावना रंगमंच्यावर येउन बोलुन दाखवल्या. सगळे जणं मनापासुन दाद देत होते. अगदि एका मुलाने तर संदिपच्या कविता, त्याच्या आणि त्याच्या मित्रांमधला एकमेकांना धीर देण्याच्या प्रसंगात काशा वापरतो ते ऐकुन तर खरच मी हललो. त्याच्या भाषेवरुन तरी तोपण माझ्या सारखाच मराठवाड्यातुन आल्या सारखा वाटत होता. मला अगदि ३-४ वर्षापुर्विचा मी आठवलो. (जाउदे ते नंतरा कधी..) पण या दोघांच काही लक्ष नव्हतं, ते आपापसातच बोलण्यात गुंग होते. मला तरी वाटते, समोर बसलेल्या १००-२०० जणांपेक्षा त्या मुलाने दिलेली दाद खरिखुरी वाटली. थोडफार तरी ऍप्रिशिएट करायला पाहिजे होत ना त्यांनी. जाऊदे. :(
बाकी कार्यक्रम नेहमी सारखाच फर्मास.. विशेषतः "ये ये ना, ये ये ना, ये ना ये ये ना" :):)

Monday, March 10, 2008

आहे मनोहर तरी..

सध्या "आहे मनोहर तरी" वाचतोय.. वाचायला घेण्या आधी वेगळ असं काहितरी वाचायला मिळेल अस वाटलं.. अर्थात ते तसं आहे खरं.. पण काय की मला नाही (भावलं) आवडलं.. म्हणजे त्या अगदि परखड लिहीतात, असं ऐकल होतं खरं, आणि ते थोड्या-फार प्रमाणात आहे.. म्हणजे मराठी साहित्यातल्या देवता विषयी लोकांना काही बोललेलं रुचणार नाही, ह्याची त्यांना पुरेपूर जाण असुनही त्यांनी परखड पणे सगळं लिहीलं आहे.. त्याबद्द्ल त्यांना नक्किच जितकी दाद द्यावी लागेल, त्यांच्या लेखनशेलीला पण तेवढीच..

पण मला मात्र त्यांच्या लेखना मध्ये थोडा एकसुरीपणा वाटला.. माझा पिंड.. माझा स्वभाव.. माझी काटकसर.. माझ्या कामाचा झपाटा..

आणि अजून एक, म्हणजे असं म्हणणं थोड धाडसच होइल.. अर्थात असं नसेलही कदाचित, पण मला असं जाणवल्याशिवाय राहवल नाही म्हणुन लिहीतो..

काही वेळेस त्यांच्या लिखाणातुन एक प्रकारची खंत जाणवते..

आहे मनोहर तरी.. कसली तरी खंत पण(???)

आपल्यातल्या गुणांची योग्य कदर न झाल्याची खंत असेल का? काय की..

सांगता नाही येणार.. अर्थात तस नसेलही, माझं हे एक वॅयक्तिक मतं..

Friday, March 7, 2008

राहत आणि आतिफ

हिन्दी गायक तसे बरेच आवडतात.. सगळेच बहुतेक.. अगदि हेमंत कुमार, मन्ना डे, रफी साब, किशोर दा पासुन सोनु, अभिजीत, उदित आणि शान पर्यंत.. अर्थातच काही अपवाद सोडुन.. (पण हिमेश किंवा मिका सारखे बोटावर मोजण्या इतकेच).. पण यांच्या पठडित न बसणारे, म्हणजे ज्यांचा आवाज रुढार्थाने कठल्याही अभिनेत्याला साजेसा होणार नाही, अशा काही व्याक्ति ईथे मुंबईच्या मायाविनगरीत आपले बस्तान मांडुन आहेत.. आणि सगळीच गाणी गाजवतायेत..

राहत फतेह अलि खान.. आणि आतिफ अस्लम.. :)

सध्या मी एकत असलेली यांची काही गाणी..

लागी मन की लगन..
जिया धडक धडक..
बोल ना हलके हलके..
जग सुना सुना लागे..
तेरे बिन..
दूरी..
मॅ एक दर्द हूं..
पेहली नजर मे..

Thursday, March 6, 2008

बोरकर


सध्या बा.भ. बोरकराच्यां या कवितेने मनात नुसता धुमाकुळ घातला आहे. आणि सलिल म्हणतो तसं, रोमान्टिझमचा कळस.. :)
आणि तो कसला खल्लास गातो.. अगदी एकताना डोळ्यात पाणीच येतं..


आयुष्याची आता, झाली उजवण, येतो तो तो क्षण, अमृताचा..
जे जे भेटे ते ते, दर्पणीचे बिंब, तुझे प्रतिबिंब लाडेगोडे..
सुखोत्सवे असा, जीव अनावर..
सुखोत्सवे असा, जीव अनावर,पिंजर्याचे दार उघडावे..

संधिप्रकाशात, अजून जो सोने, तो माझी लोचने मिटोनी यावे..

असाविस पास, जसा स्वप्न भासं, जीव कासाविस झाल्या विना..
तेंव्हा सखे आणं, तुळशीचे पान, तुझ्या घरी वाण नाहि त्याची..
तुच ओढलेले, दे सवेचे पाणी, थोर ना त्याहूनी तिर्थ कोणी..
संधिप्रकाशात, अजून जो सोने, तो माझी लोचने मिटोनी यावे..

वाळल्या ओठा दे, निरोपाचे फुल, भुलितली भुल शेवटची..
संधिप्रकाशात, अजून जो सोने, तो माझी लोचने मिटोनी यावे..
:(

Thursday, February 28, 2008

मुहूर्त

चला आज मुहूर्त लागला म्हणायचा. अगदिच काही ठरवल नव्हतं, सकाळी येताना की ब्लोग आजच सुरु करयचा वैगरे.. पण अचानक वाटल, आणि सुरू केला.. हो पण, विचार ब~याच दिवसापासुन मनात घोळत होता. असो दिवस पण छान आहे. गजानन महाराज प्रकटदिन.
तर आजचा श्रिगणेशा गजाननास अर्पण..